जामनेरच्या राजकीय रणभूमीवर गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक विजय: जनतेत जल्लोष, मिरवणुकीत उधळला आनंदाचा गुलाल - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या राजकीय रणभूमीवर गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक विजय: जनतेत जल्लोष, मिरवणुकीत उधळला आनंदाचा गुलाल

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आज सकाळपासूनच जामनेर शहरात एक विशेष वातावरण तयार झालं होतं. नागरिक उत्सुकतेने पाहत होते की, कोण होणार विजयी? अखेर, जामनेरच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘विजय राजा’ गिरीश महाजन यांनी 26,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या ऐतिहासिक विजयावर जामनेर वासीयांनी उत्साहात उधळले गुलाल आणि फुलांची मण्यांची सजावट केली.गिरीश महाजन यांच्या विजयाची बातमी ऐकून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात रंगलेल्या जामनेरच्या गल्लीगल्ल्यात तुफान मिरवणुका सुरू केल्या. जेसीबी मध्ये फुलांची मण्यांची सजावट, डंपरमध्ये गुलाल उधळण्यासाठी तयारी, फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक सुरू झाली. सगळीकडे विजयाच्या आनंदात वाजत गाजत वातावरण तयार झालं.त्यानंतर, गिरीश महाजन यांनी विजयाचा आनंद जनतेसोबत साजरा करत सर्वांच्या आशीर्वादाचे आभार मानले. “हा विजय माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. मी नेहमीच तुमच्या सेवेत तत्पर राहीन, जामनेरची प्रगती आणि विकास हेच माझं जीवनाचं ध्येय आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.गिरीश महाजन यांचा हा सातवा विजय म्हणजेच जामनेर शहरासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे. जनतेचा विश्वास आणि त्यांची कार्यशक्ती सिद्ध करत त्यांनी पुन्हा एकदा जामनेरात राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे.या ऐतिहासिक विजयाच्या दिवशी जामनेरच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वॉर्डात विजयी महाजन यांचा उत्साहात पाठिंबा आणि प्रेम पाहायला मिळालं.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads