जामनेर पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र प्रदान - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र प्रदान

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर – विधानसभा निवडणुकीच्या काळात जामनेर-पहूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान प्रभावी कामगिरी करत उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी चारचाकी वाहनातून तब्बल ₹17,26,400 रोख रक्कम जप्त केली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता, शांततेत आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात त्यांच्या समर्पण व कठोर परिश्रमांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटत असून, त्यांच्या सेवेची दखल घेत पोलिस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जयसिंग राठोड यांना प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले व भावी काळातही अशीच उत्कृष्ट सेवा बजावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.पोलिस दलाच्या उज्ज्वल परंपरेला अभिवृद्धी करणाऱ्या जयसिंग राठोड यांच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads