नाशिक विभागीय कराटे स्पर्धेत जळगाव पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीची चमकदार कामगिरी...
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शालेय कराटे नाशिक विभागीय स्पर्धा २०२४ यशस्वीरित्या संपन्न झाल्या. या स्पर्धेत जळगाव पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
१४ वर्षांखालील ५५ किलो वजनी गटात: कौस्तुभ राजेंद्र जंजाळे
१४ वर्षांखालील मुलींच्या ३० किलो वजनी गटात: अवनी निलेश सोनवणे
१७ वर्षांखालील मुलींच्या ६४ किलो वजनी गटात: गोरचना योगेश पाटील
१९ वर्षांखालील मुलांच्या ७० किलो वजनी गटात: वेदांत समाधान हिवराळे
या खेळाडूंनी पुढील २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवल्यास हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी पात्र ठरतील.
खेळाडूंच्या या यशात जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक गृह संजय गायकवाड, राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, सहायक पोलिस निरीक्षक (वेल्फेअर) योगिता नारखेडे, पोलिस उपनिरीक्षक गायकवाड, तसेच पप्पू देसले, अश्विनी निकम/जंजाळे, जागृती काळे/महाजन, राजेंद्र जंजाळे, प्रथमेश वाघ, आणि स्वप्नील निकम यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.खेळाडू २८ नोव्हेंबर रोजी स्पर्धेसाठी रवाना होणार असून, जिल्ह्यातील नागरिक आणि पोलिस दलाकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा