मंद्रूपमध्ये मळसिध्दप्पा यात्रेतील वाद मिटला ; राजेश देशमुख-गुरूसिध्द म्हेत्रे एकत्र... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूपमध्ये मळसिध्दप्पा यात्रेतील वाद मिटला ; राजेश देशमुख-गुरूसिध्द म्हेत्रे एकत्र...

ग्रामदैवत श्री मळसिध्दप्पा यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी एडवोकेट राजेश देशमुख, माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे,पिराप्पा म्हेत्रे, हर्षवर्धन देशमुख, पंचाक्षरी स्वामी, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, तमण्णा पुजारी, गेनसिध्द पुजारी व अन्य

समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या मंद्रूप येथील ग्रामदैवत मळसिध्दप्पा यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट राजेश देशमुख आणि माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे यांच्यात निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून यंदा मोठ्या उत्साहात यात्रा साजरा करण्याचा निर्णय देशमुख व म्हेत्रे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत जाहीर केला.
      गतवर्षी, राजेश देशमुख व गुरुसिध्द म्हेत्रे हे काही कारणांमुळे एकमेकांवर नाराज झाले होते.त्यामुळे देशमुख हे कुस्ती स्पर्धेला आले नव्हते.यंदा यात्रेची वर्गणी घेण्यावरून देशमुख यांनी पत्रकार परिषदेत घेऊन नागरिकांनी विश्वस्तांनाच देणगी द्यावी असे सांगितले होते.गुरूसिध्द म्हेत्रे यांनीही पुजारी लोकांना सोबत घेऊन स्वतंत्ररित्या कुस्ती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.अखेर गावातील यात्रेला गालबोट लागू नये म्हणून दैनिक संचार'चे पत्रकार पंचाक्षरी स्वामी, बाळासाहेब देशमुख, तमण्णा पुजारी,गेनसिध्द पुजारी,मळसिध्द पुजारी,सोमनिंग पुजारी यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक घडवून आणली.
     यावेळी बैठकीत देशमुख व म्हेत्रे यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन संपूर्ण यात्रा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.रविवारी,देशमुख यांच्या वाड्यात पत्रकार परिषद घेऊन यांची घोषणा करण्यात आली.यावेळी बोलताना राजेश देशमुख म्हणाले, गतवर्षी काही कारणांमुळे नाराजी होती,ती नाराजी बैठकीत दूर झाली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही १२ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान पाच दिवस मळसिध्दप्पा देवाची यात्रा भरणार आहे.यंदाही मोठ्या प्रमाणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सर्व मानकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रा यशस्वी करू असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
       यावेळी माजी सभापती म्हेत्रे म्हणाले, गतवर्षी माझ्यात व देशमुखांमध्ये नाराजी होती.ती आता दूर झाली आहे.यंदा मोठ्या कुस्ती फडाचे अध्यक्षस्थान राजेश देशमुख हे भूषविणार असून गुरुसिध्द म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. यावेळी 
      देशभरातील नामवंत पैलवानांना पाचारण करण्यात आले असून यंदाही जंगी कुस्त्यांचे फड रंगणार आहे.विविध राजकीय मान्यवर व जिल्ह्यातील नागरिक कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.सर्व मानकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रा यशस्वी करू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
     यावेळी माजी सरपंच पिराप्पा म्हेत्रे,हर्षवर्धन देशमुख,सुरेश पाटील, सुरेश टेळे,अविनाश देशमुख, चंद्रकांत देशमुख, सुरेश देशमुख, सुनिल व्हनमाने,सोमनिंग टेळे,प्रा.बसवराज कुमठेकर, जगन्नाथ म्हेत्रे,नागनाथ म्हेत्रे, नागनाथ लोभे, ओंकार म्हेत्रे, मल्लिकार्जुन जोडमोटे आदी उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads