जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे वाघूर नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक थांबवण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
बैठकीत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच तुकाराम विठोबा निकम, पोलीस पाटील राहुल पाटील, तलाठी माळी सर, कोतवाल वेदू इंगळे, ग्रामसेवक अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत स्थानिक प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे ठरवले असून, सर्व ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी गावातील सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads