जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या हस्ते शिवस्वराज्य न्युज प्रतिनिधींचा संविधान पुस्तिका देऊन सत्कार व सन्मान
जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी नितीन इंगळे, तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण तायडे आणि देविदास विसपुते यांचा विशेष सत्कार केला. या प्रसंगी त्यांना भारताचे संविधान पुस्तिका प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी पत्रकारितेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, पत्रकार हे समाजाचे आरसेअसतात. ते समाजातील वास्तव प्रतिबिंबित करून विकासाला चालना देतात असे त्यांनी सांगितले.तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पालवे साहेब यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्रकारांच्या परिश्रमाचे कौतुक करताना सांगितले की, सत्य आणि न्यायासाठी लढणारे पत्रकार समाजाच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने योगदान देतात. संविधान पुस्तिकेच्या प्रती मिळाल्याने विशेष आनंद व्यक्त केला. संविधान हे भारतीय लोकशाहीचे बळकटीकरण करणारे सर्वोत्तम मार्गदर्शक तत्व आहे, असे मत या वेळी मांडण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा