लोकनेते कै.बाबुराव (आण्णा) पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.... - दैनिक शिवस्वराज्य

लोकनेते कै.बाबुराव (आण्णा) पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा....

समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) :  दि. 26 जानेवारी रोजी आपल्या भारत देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन सोलापूर जिल्हा बाल विकास समिती, सोलापूर संचलित, कै.बाबुराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. 
    सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करून तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या आधी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून  विद्यार्थ्यांनी, बुलुंद भारताचे प्रमुख ओळख म्हणून भारताला लाभलेले धार्मिक संस्कृती, प्राचीन ऐतिहासिक वारसा, हरित धोरण आणि राष्ट्रीय एकात्मता या चार विषयांवरती, त्याचे प्रतिक म्हणून सर्वांसमोर देखावा स्वरुपात प्रतिकृती सादर केली. 
यामध्ये प्रामुख्याने देशातील पालखी सोहळा, शिवनेरी किल्ला, ग्रीन सिटी व दिल्ली येथील इंडिया गेट आणि राष्ट्रीय एकात्मताचे चिन्ह यांची प्रतिकृती तयार करून प्रदर्शनास ठेवले. या प्रदर्शनाच्या उपक्रमाने कार्यक्रमा मध्ये रंगत आली व सर्व विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली. तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनातील देखाव्यांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचे मनोबल वाढवले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, यात गेल्या वर्षभरात, अपूर्ण मनुष्यबळ असूनही  प्रशालेत झालेल्या सकारात्मक बदलांचे व विध्यार्त्यांच्या सर्वांगीण विकासाचे दृष्टीकोन ठेवत, संस्थेने राबवलेल्या विविध नवीन उपक्रमांचे कौतुक व अभिनंदन केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे संस्थापक, कर्मयोगी लक्ष्मण तात्या वाघचवरे यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. 
त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कवायत केले, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्वरूपात देशभक्तीपर गीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा,कविता वाचन इ. उपक्रमात सहभाग घेतला.तसेच प्रशालेच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि BMIT तिऱ्हे येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शना मध्ये पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये ३ रा क्रमांक आणि निंबर्गी येथे झालेल्या चित्र रंग भरण स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांकाचे यश संपादन केलेली विद्यार्थींनी कु.ईश्वरी गोटखिंडे हिचा प्रमुख पाहुण्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वडापूर गावचे ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील आणि प्रदीप पुजारी हे लाभले.व इतर मान्यवर प्रभाकर गरड सर, शब्बीर सय्यद व संस्थेचे खजिनदार ज्ञानदेव पाटील हे होते. देखावे व प्रदर्शन करण्याची संकल्पना संस्थेचे सचिव दर्शनजी वाघचवरे यांनी दिली व कार्यक्रम नियोजन करण्याचे सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बंडगर सर, भोसले सर, पवार सर व प्रशालेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रशालेतील मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads