वैशाली सरदार यांची भुसावळ तालुका महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी निवड... - दैनिक शिवस्वराज्य

वैशाली सरदार यांची भुसावळ तालुका महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी निवड...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
भुसावळ येथे रविवारी (दि. ५ जानेवारी २०२५) अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनेची बैठक देशमुख कॉम्प्युटर सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव राकेश चव्हाण होते. बैठकीत भुसावळ तालुका कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत वैशाली सरदार यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर अमोल राऊत (उपाध्यक्ष), निलेश कोलते (सचिव), निलेश पाटील (सहसचिव), अनिश देशमुख (कोषाध्यक्ष), आणि अँड. सागर बहिरूने (सल्लागार) यांचीही निवड करण्यात आली.
बैठकीत शहर व तालुक्यातील महा-ई सेवा केंद्र आणि आधार केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक समस्यांवर चर्चा झाली आणि संघटनेच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित सदस्यांचे जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये अमिन पटेल, समीर मन्सूरी, आकाश कोळी, वाजित खान, बी. एल. पवार, प्रकाश सरदार, संतोष कोळी, चंदन तायडे, फरजना बेगम अब्दुल रहुफ, नीलकंठ गव्हाले, इमल्यास कासम, गुलाब पवार, रईस अहमद ताजमोहमद, प्रथमेश जोशी, राहुल सपकाळे, नंदन सपकाळे, विकास चौधरी, अकीब बनीवाले, हरीश बोरसे, दिपक फेगडे, राहुल बरडे, शेख वसीम यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिश देशमुख यांनी केले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads