जामनेरच्या पत्रकारांचा राज्यस्तरीय सन्मान!मलकापुर येथे पत्रकार दिन सोहळ्यात कर्तृत्वाचा गौरव
मलकापुर - पत्रकार दिनाच्या निमित्ताने हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात जामनेरच्या पत्रकारांनी चमकदार उपस्थिती लावली. खामगाव पोलीस स्टेशनचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते जामनेरच्या पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सन्मानित पत्रकारांची नावे
साहेबराव शिरसागर, अरुण तायडे, नितीन इंगळे, देविदास विसपुते, सुनील इंगळे, शांताराम झाल्टे, अनिल शिरसाट, मनोज दुसाने, मोहन जोशी, मोहन दुबे, सागर लव्हाले, किरण चौधरी, अक्षय वानखेडे.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी पत्रकारांच्या निर्भीड लेखणीचा गौरव करत, सामाजिक बांधिलकीसाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मांडले.पुरस्कार वितरण सोहळ्यात थोरात साहेबांनी पत्रकारितेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत, पत्रकार हे समाजाचा आरसा असून, त्यांच्या मेहनतीमुळे समाजातील समस्यांना वाचा फोडली जाते, असे गौरवोद्गार काढले.
या सन्मानामुळे जामनेरच्या पत्रकारांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी कार्यक्रमाने त्यांना नवी ऊर्जा दिली. जामनेरचा गौरव
राज्यस्तरीय व्यासपीठावर जामनेरच्या पत्रकारांनी आपली चमकदार ओळख प्रस्थापित करत, पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचे हे सन्मानपत्र भविष्यातील दिशादर्शक ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Previous article
Next article

सर्वांचे अभिनंदन....तुला पुढील यशस्वी वाटचाली करिता सस्नेह शुभेच्छा !
उत्तर द्याहटवा