ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी उलगडला शिवकालीन इतिहास...
जामनेर – दिनकर महाराज बहुद्देशीय संस्था संचालित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE PATTERN) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम, शिक्षिका सौ. कोमल शिंदे व कु. संजना सोनी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे सजीव सादरीकरण केले. काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, शाहीर आणि मुहाल यांच्या वेशभूषेत होते, तर विद्यार्थिनींनी जिजामाता आणि सईबाई यांचे रूप धारण केले होते. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.शाळेच्या शिक्षिका सौ. सीमा श्रोत्रीय, सौ. सुचिता सोनवणे, सौ. नीतू शर्मा, कु. श्रुती जोशी, कु. नीलिमा सपकाळे मॅडम यांनीही पारंपरिक मराठमोळी वेशभूषा परिधान करून शिवजयंतीला विशेष रंगत आणली. कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण शाळेत शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीला समजावी आणि त्यांचे विचार आत्मसात करता यावेत, यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे शिक्षक व पालकांनी यावेळी सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा