नेरी येथे शिवभोजन थाळ्यांची कमतरता, गरजू लोक परत जाण्याची वेळ
नेरी, ता. जामनेर – महाराष्ट्र शासनाने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजना अंतर्गत जामनेर तालुक्यातील नेरी येथे प्रदीप निकम यांना 75 थाळींचे वाटप करण्याचा ठेका मिळाला आहे. परंतु, प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याने थाळ्यांची संख्या अपुरी ठरत आहे.
आज शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी नितीन इंगळे व केशरीराज न्यूजचे देविदास विसपुते यांनी या ठिकाणी भेट दिली असता, गरजू नागरिकांना अन्न न मिळाल्याने परत जावे लागत असल्याचे दिसून आले. 75 थाळ्यांचे मर्यादित बजेट असल्याने अनेकांना भोजन न मिळताच जावे लागते, ही परिस्थिती पाहून हळहळ व्यक्त होत आहे.
यासंदर्भात प्रदीप निकम यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आम्ही सरकारकडे थाळी वाढवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. आम्हाला गरजूंसाठी अधिक थाळ्या उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून कोणालाही उपाशी परत जावे लागणार नाही.
गरजू लोकांच्या सेवेसाठी शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.गोरगरीब नागरिकांसाठी सुरू असलेल्या या योजनेत थाळ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासनाने तातडीने या विषयाकडे लक्ष देऊन थाळ्यांचे प्रमाण वाढवावे, जेणेकरून कुणालाही उपाशी परत जावे लागणार नाही.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा