महाराष्ट्र
पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या[ DMCJ ] विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन.....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दि.2 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ भाई छन्नूसिंह चंदेले महाविद्यालय सोलापूर पत्रकारिता अभ्यासक्रम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या[ DMCJ ] विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबीर घेण्यात आले. यामध्ये सन.1860 चा जुना भारतीय कायदा आणि सन.1जुलै 2024 चा नवीन भारतीय कायदा, कायद्यातील नवीन कलम व तरतुदी याबाबतीत पाहुण्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कायदेतज्ञ प्राध्यापक ॲड. अरविंद देडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.ॲड.अरविंद देडे यांचा शैक्षणिक परिचय पुढीलप्रमाणे प्रा. देडे यांनी सोलापूर विद्यापीठामधून सन.2014 मध्ये बी.एस.सी.एल.एल.बी.प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण आहेत.सन 2016 मध्ये सोलापूर विद्यापीठामधून द्वितीय क्रमांकाने एल.एल.एम.प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. तसेच 2016साली राज्य पात्रता परीक्षा (सेट) प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, डिप्लोमा इन लेबर अँड वेल्फेअर लॉ, डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण केले.सन 2014 मध्ये सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात केली. गरजू आणि गोरगरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरण सेवा ॲडव्होकेट पॅनल मध्ये नेमणूक झाली. सन 2017 मध्ये लोकमान्य टिळक विधी महाविद्यालया सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर शहर येथे विविध कायदेविषयक शिबिरांमध्ये मार्गदर्शक करीत आहेत. विधीअधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन तासिकेमध्ये प्राध्यापक.ॲड अरविंद देडे यांनी पोस्को कायदा,ॲट्रॉसिटी कायदा, सामान्य नागरिकांचे कायदेविषयक अधिकार, भारतीय कायद्यांमध्ये काळानुरूप झालेले बदल, पत्रकारिता व पत्रकार यांच्यासंबंधित हक्क,अधिकार, जबाबदारी,भूमिका आदी. विषयांवर सखोल माहिती आणि मार्गदर्शन पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना केले.
तसेच प्रा.ॲडव्होकेट अरविंद देडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा प्राधिकरण या विभागाअंतर्गत चालणाऱ्या कामांची माहिती दिली. पाहुण्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नवीन भारतीय कायदा 1जुलै 2024 बद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, नवीन कायद्याबद्दलची सविस्तर माहिती, कायद्यातील कलमांविषयीची माहिती,तरतुदी इत्यादी.बाबतीत पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भाई छन्नूसिंह चंदेले महाविद्यालयाच्या संस्थापिका अध्यक्ष तथा माजी महापौर नलिनी चंदेले,प्रा.सिद्धार्थ गायकवाड, प्रा.विशाल पाटील, प्रा.विजयकुमार लोंढे, प्रा. मनीषा पाटील तसेच पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी ह्या ऑनलाइन कायदेविषयक मार्गदर्शन तासिकेसाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजयकुमार लोंढे यांनी केले तर आभार प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा