जळगाव जिल्हा प्रशासनाचा ग्रामपंचायतींना महत्त्वाचा संदेश.. - दैनिक शिवस्वराज्य

जळगाव जिल्हा प्रशासनाचा ग्रामपंचायतींना महत्त्वाचा संदेश..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) 2025-26 तयार करताना एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे. या आराखड्यात काही बाबींची तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे स्वच्छ व हरित ग्रामपंचायतींच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलता येतील.

स्वच्छ व हरित ग्रामपंचायतसाठी पुढील बाबींसाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे:

1. कचरा संकलन वाहनांची खरेदी (शिल्लक असलेली)


2. घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या बसविणे


3. कचरा वर्गीकरण शेड उभारणी


4. स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या सर्व मालमत्तांचे देखभाल व व्यवस्थापन


5. स्वयं-सहायता गट (SHG) किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन


6. कचरा व्यवस्थापनासाठी सुरक्षा किट खरेदी


7. 15 व्या वित्त आयोगाच्या 30% निधीतून उर्वरित SBM कामे पूर्ण करणे

सर्व जिल्ह्यांनी आपल्या ग्रामपंचायतींच्या GPDP आराखड्याची त्वरित पडताळणी करून आवश्यक माहिती प्रशासनाला सादर करावी.

 स्वच्छ व सुंदर गावांसाठी एकत्र येऊन काम करूया आणि आपले गाव अधिक विकसित बनवूया



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads