महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभूलिंग मंदिर, वडापूर येथे अॅग्रीस्टॅक (Agristack) योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढण्याचे शिबीर संपन्न.... - दैनिक शिवस्वराज्य

महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभूलिंग मंदिर, वडापूर येथे अॅग्रीस्टॅक (Agristack) योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढण्याचे शिबीर संपन्न....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : वडापूर येथील प्रभुलिंग यात्रेनिमित्त वडापूर व अंत्रोळी व परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी दि. 28 फेब्रुवारी रोजी Agristack योजनेअंतर्गत Farmer ID काढण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभूलिंग मंदिर, वडापूर येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्यांचे Farmer ID काढायचे राहीले होते त्यांनी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत येण्याचे आवाहन करण्यात आले होते व येताना आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल तसेच एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी त्यांचे जातीचा दाखला / प्रमाणपत्र सोबत आणावे किंवा फोटो आणावे, खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र अथवा दाखला आणण्याची आवश्यकता नाही, व अंत्रोळी व वडापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली होती. या शिबिरात पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी सहकार्य करून आपला Farmer ID काढुन घेतले.
    या शिबिरास अंत्रोळीचे ग्राम महसूल अधिकारी एस. बी. कदम व कुसूरचे ग्राम महसूल अधिकारी अजय जयस्वाल व कृषी सहाय्यक संतोष साठे महसूल सेवक बसवंत सुतार तसेच अंत्रोळी व वडापूर येथील ई महा सेवा केंद्र व सीएससी सेंटरचे चालक रमेश शेख, समीर शेख, पंकज पाटील, संजय पारसे व प्रभुलिंग यात्रा कमिटीचे अरुण पाटील, गणपत पुजारी ,प्रमोद गुंड, बिपिन पाटील व सर्व कमिटी सदस्य यांचे सहकार्य लाभले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads