पॅन आणि आधार कार्डच्या गैरवापराची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन - दैनिक शिवस्वराज्य

पॅन आणि आधार कार्डच्या गैरवापराची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. 13 (शिवस्वराज्य न्यूज) – नागरिकांच्या पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर होण्याच्या घटना वाढत असून, बोगस GST नोंदणीसाठीही यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने केले आहे.
काही सेवाभावी संस्था किंवा गट परवानगीशिवाय नागरिकांच्या पॅन कार्डचा वापर करून GST नोंदणी करू शकतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे नाव बोगस आर्थिक व्यवहारांमध्ये अडकू शकते. आपले पॅन कार्ड गैरवापर झाले आहे का, हे तपासण्यासाठी gst.gov.in > Search Taxpayer > Search by PAN या संकेतस्थळावर माहिती पाहता येईल.
फसवणुकीची शंका आल्यास त्वरित केंद्रीय जी.एस.टी. विभागाच्या नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर येथील कार्यालयांशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
▪️ नाशिक – 0253-2313299
▪️ जळगाव – 0257-2224844
▪️ धुळे – 02562-270465
▪️ अहमदनगर – 0241-2451342
नागरिकांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, सातबारा, वीज बिल यांसारखी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची तक्रार करावी, असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने केले आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads