काळ्या बाजारात अंगणवाडी पोषण आहार तांदुळाची परस्पर विक्री . . . मदतनिस व सेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ... देऊळगावगुजरी येथील घटना... - दैनिक शिवस्वराज्य

काळ्या बाजारात अंगणवाडी पोषण आहार तांदुळाची परस्पर विक्री . . . मदतनिस व सेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ... देऊळगावगुजरी येथील घटना...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील  देऊळगावगुजरी येथील 0 ते ३ वर्ष वयोगटातील अंगणवाडीच्या बालकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदुळाची परस्पर विक्री करीत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर तांदुळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
याबाबत प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती तोताराम भिसे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती संतुकराव कदम यांचेसह फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की देऊळगावगुजरी येथील अंगणवाडी सेविका लताबाई रामचंद्र मोरे व मदतनिस ज्योती अनिल माळी या दोघींनी संगनमत करून भरदुपारी अंगणवाडी शालेय पोषण आहाराचा ११२ किलो तांदूळ किंमत २४६४ रुपये फत्तेपूर येथील सोहिल नबा कुरेशी व जुबेर रहिम कुरेशी या दोघांना विक्री केला ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला कळविले पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मुद्देमालासह तांदुळ खरेदी करणाऱ्यांना ताब्यात घेतले त्यांना विचारणा केली असता त्यांनी मदतनिस व सेविका यांनी तांदूळ विकल्याची कबूली दिली याबाबत स.पो.निरीक्षक गणेश फड यांनी गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी भारती भिसे व पर्यवेक्षिका ज्योती कदम यांना फत्तेपूर पोलीस ठाण्यात पाठवले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५) अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ ,७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स.पो.नि.गणेश फड यांचे मार्गदर्शनात हेड कॉ . प्रविण चौधरी, गनी तडवी करीत आहे .


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads