सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्र्यंबकेश्वर परिसर पाहणी... - दैनिक शिवस्वराज्य

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्र्यंबकेश्वर परिसर पाहणी...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी गोदावरी नदी, घाट, नील पर्वत, बिल्व तीर्थ यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून कुंभमेळ्यासाठी आवश्यक सुविधांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
मंत्री महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले की, कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण व्हावीत आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या साधू, महंत व भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात. धार्मिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी घाटांची स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तसेच श्री हरीगिरीजी महाराज आणि श्री रवि पुजारी महाराज यांच्यासह विविध अधिकारी आणि धार्मिक गुरु उपस्थित होते.सिंहस्थ कुंभमेळा हा लाखो भाविक आणि साधू-संतांचा महामिलन सोहळा असतो. त्यामुळे येत्या काळात त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी परिसरातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads