सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना टॉप कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित - दैनिक शिवस्वराज्य

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना टॉप कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651), जामनेर पोलीस स्टेशन यांना टॉप कॉप ऑफ द मंथ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा सन्मान देण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते पगारे यांना हा सन्मान देण्यात आला. तसेच, जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनीही जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.हा पुरस्कार पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना दिला जातो. जयेंद्र पगारे यांच्या या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads