महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न ....
सोलापूर (मंद्रूप): कोणतेही काम भगवंताचे कार्य समजून केलात तर समाज त्याची तुम्हाला फळे देण्यासाठी पुढे येईल. पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. तेव्हा पत्रकारांनी समाजाला जागृत ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन काशी पिठाचे जगद्गुरु डॉ.
मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
मंद्रुप येथे शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचा आदर्श सन्मान पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, आप्पाराव कोरे, डॉ. चनगोंडा हविनाळे, अशोक देवकते, पिराप्पा म्हेत्रे, वसंत पाटील, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरपंच अनिता कोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे, सुभाष पाटील, संगमेश बगले, चंद्रकांत खुपसंगे, आप्पासाहेब काळे, दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांच्यासह माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जगद्गुरु म्हणाले, दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेने समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे चांगले काम केले आहे. येणाऱ्या काळातही संघटनेने असेच समाज उपयोगी उपक्रम राबवावे.
माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे म्हणाले, समाजात जे काही चाललेले आहे, त्याचे प्रतिबिंब पत्रकारांच्या लेखणीतून बातमीच्या रूपाने आपल्याला समजते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो मजबूत असला पाहिजे. पत्रकाराने यापुढील काळात ही समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडावेत असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार दिलीप माने म्हणाले, दक्षिण सोलापूरचे पत्रकार जागृतपणे विकासासाठी काम करतात. त्यांच्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.दक्षिण सोलापूरच्या विकासामध्ये पत्रकारांचे योगदान आहे.
यावेळी बाळासाहेब शेळके म्हणाले, समाजातील प्रश्न आणि जनभावना परखडपणे मांडण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.त्यांच्यामुळेच आज लोकशाही टिकून आहे. दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेने घेतलेला हा पुरस्काराचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी केले.सूत्रसंचालन सुरेश वाघमोडे व अशोक कस्तुरे यांनी केले. तर पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
🔴या मान्यवरांचा झाला सन्मान....
तहसीलदार किरण जमदाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड ,समाजसेवक महादेव कोगनुरे, धनेश आचलरे
जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार विजय देशपांडे, विजय साळवे, अजित उंब्रजकर,अनिल कदम.
आदर्श शिक्षक : निलेश नंदरगी, प्रतिभा दुधगी, फरजाना सय्यद, जनाबाई पवार.
आदर्श क्रीडाप्रशिक्षक शिवराज मुगळे, काशिनाथ भतगुणकी, आदर्श शेतकरी : गंगाधर बिराजदार (निंबर्गी), पंडीत बुळगुंडे (संजवाड), पुष्पा खातेनवरू (नांदणी), व ग्रामसेवक नागेश जोडमोटे व वृक्षमित्र मनोज देवकर.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा