जामनेरात ट्रॅक्टर चालकाचा गोंधळ – बँक आणि पोस्ट ऑफिस परिसरात आठ ते दहा दुचाकींचे नुकसान - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात ट्रॅक्टर चालकाचा गोंधळ – बँक आणि पोस्ट ऑफिस परिसरात आठ ते दहा दुचाकींचे नुकसान

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर  शहरातील वाकी रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसजवळ आज दुपारी एका ट्रॅक्टर चालकाने गोंधळ घालत आठ ते दहा दुचाकींच्या जोरदार धडक बसवली. या अपघातात दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या परिसरात पार्किंगची कोणतीही सुविधा नसल्याने अनेक वाहने रस्त्यावर लावली जातात. सेंट्रल बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते, त्यामुळे हा भाग कायमच गर्दीने भरलेला असतो. याच गर्दीचा फटका आज दुचाकीस्वारांना बसला.दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, जामनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत. या अपघातानंतर नागरिकांनी संबंधित ट्रॅक्टर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads