जामनेर तालुका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी राजधर पाटील, व्हाॅईस चेअरमनपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी राजधर पाटील, व्हाॅईस चेअरमनपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (ता. २८ मार्च) – जामनेर तालुका शेतकरी सह. जिनिंग व प्रेसिंग सोसायटी लि., जामनेरच्या चेअरमनपदी राजधर रामधन पाटील (रा. जळांद्री) तर व्हाॅईस चेअरमनपदी सचिन भगवान पाटील (रा. गोद्री) यांची बिनविरोध निवड झाली.

आज (२८ मार्च) झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमन आणि व्हाॅईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे राजधर पाटील आणि सचिन पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

सभेसाठी संस्थेचे एकूण ११ संचालक उपस्थित होते, त्यामध्ये
१) भगवान पुंडलिक पाटील
२) राजधर रामधन पाटील
३) शरद त्र्यंबक पाटील
४) प्रमिलाताई राघो पाटील
५) भास्कर शंकर पाटील
६) नाना राजमल पाटील
७) अनिल अशोक पाटील
८) पुंडलीक बाबुराव पाटील
९) दिवाकर रायाजी पाटील
१०) दिलीप नारायण पाटील
११) सचिन भगवान पाटील

बिनविरोध निवडीनंतर मा. डिंगबरदादा पाटील, मा. दिलीप खोडपे, मा. जगनदादा लोखंडे, मा. किशोर पाटील, मा. शंकरभाऊ राजपूत, मा. राघोदादा पाटील, मा. अरुण उघडे, मा. प्रभाकर पाटील, मा. सुधाकरभाऊ यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाॅईस चेअरमन यांचा सत्कार करत अभिनंदन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे मॅनेजर पद्माकर चौधरी, गजानन पाटील आणि कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads