जामनेर तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण सोडत 21 एप्रिल रोजी –जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांची माहिती - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण सोडत 21 एप्रिल रोजी –जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांची माहिती

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

 ग्रामीण भागाच्या विकासात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कारभाराचा आधारभूत दुवा म्हणजे सरपंच पद. या पदासाठी कोणता गट, जमात किंवा प्रवर्ग पात्र ठरणार, याबाबत उत्सुकता असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दिवस जवळ आला आहे. जामनेर तहसील कार्यालयाच्या वतीने प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील एकूण 107 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण सोडत सोमवार, दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती सभागृह, जामनेर येथे पार पडणार आहे.या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय नागरिक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह विविध घटकांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, महिलांसाठी राखीव जागाही जाहीर केल्या जातील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया पार पाडली जात असून, पारदर्शकता व न्याय्यतेचा निकष ठेवून सर्व सोडत निश्चित केली जाणार आहे.तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, राजकीय पदाधिकारी तसेच जागरूक ग्रामस्थांनी या प्रक्रियेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या आरक्षण सोडतीनंतर गावागावांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीला एक नवा रंग चढणार यात शंका नाही.

गावाच्या नेतृत्वाचे भविष्य ठरणाऱ्या या प्रक्रियेचा साक्षीदार व्हा – 21 एप्रिल, पंचायत समिती सभागृह, जामनेर

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads