शिवराय-भीमराय जलसा"च्या माध्यमातून क्रांतीचा जागर — 27 एप्रिल रोजी जामनेरमध्ये भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रम - दैनिक शिवस्वराज्य

शिवराय-भीमराय जलसा"च्या माध्यमातून क्रांतीचा जागर — 27 एप्रिल रोजी जामनेरमध्ये भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रम

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
संघमित्रा बहुउद्देशीय संस्था, जामनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एक भव्य आणि प्रबोधनात्मक "शिवराय-भीमराय जलसा" आयोजित करण्यात आला आहे.

हा ऐतिहासिक जलसा 27 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता संघमित्रा बुद्ध विहार, भुसावळ रोड, जामनेर येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे.

या जलशाची खास आकर्षण ठरणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका "भीमराज की बेटी" फेम पंचशीलाताई भालेराव आणि त्यांच्या संचाचे सादरीकरण. त्यांच्या सशक्त आवाजात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम प्रबोधन, संगीत आणि नृत्य यांचा संगम साधणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संघमित्रा बहुउद्देशीय संस्था जामनेर चे अध्यक्ष दादाराव वाघ, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुवर, सचिव किशोर सोनवणे, खजिनदार भारत लोखंडे, सहखजिनदार संदीप डोंगरे,सुधाकर अप्पा सपकाळे भिमशक्ती महाराष्ट्र राज्य, राज जाधव ,गजानन तायडे सदस्य नितीन मोरे व दीपक शिरसाठ ,सुशील लोखंडे,प्रशिक सोनवणे ,राज वाघ,निलेश कुवर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने जामनेर शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक, भीमसैनिक बंधू-भगिनींना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads