यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पत्रकारिता शिक्षणक्रम विभागाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पत्रकारिता शिक्षणक्रम विभागाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालयाच्यावतीने वृत्तविद्या व जनसंज्ञापन पदविका या एक वर्षाच्या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. 
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय संचालक डॉ. विश्वास गायकवाड, पुणे विभागाचे कक्ष अधिकारी संतोष वामन, पुणे विभागाचे सहाय्यक प्रदीप गायकवाड, दैनिक दिव्य मराठी उपसंपादक विजयकुमार गायकवाड, तसेच नोंदणी विभागाचे उपकुलसचिव मनोज घंटे ,भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय संचालिका रोझा चंदेले, केंद्रप्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड, केंद्र संयोजक मनीषा पाटील, प्रा.ॲड.अरविंद देडे, कृषी विभागाचे मनोज पाल, पर्यावरण दूत मनोज देवकर, ॲड. स्नेहल शिवपुंजे, विभागप्रमुख प्रा.विजयकुमार लोंढे, प्रा.विशाल पाटील, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
    यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन संतोष पवार यांनी केले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले.
    यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण प्रवासातील अनुभव, आव्हाने आणि आठवणी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकताना विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शन तसेच ऑनलाईन तज्ज्ञ कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थी गौतम थापटे , अरुणा वैरागकर , पालक रविकिरण चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
   यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमधून पदवी संपादन करून सध्या शासकीय नोकरीत असलेले गुणवंत माजी विद्यार्थी गौरव फंदेलेलू यांनी बोलताना महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
    दैनिक दिव्य मराठी उपसंपादक विजयकुमार गायकवाड यांनी बातमीमुळे निर्माण होणारे चांगले-वाईट परिणाम याविषयी माहिती सांगितली.
प्रा.ॲड अरविंद देडे यांनी बोलताना पत्रकारांनी आपल्या कामात कायद्याचे पालन करणे आवश्यक असते, तसेच कायद्यामध्ये झालेले बदल याविषयी माहिती दिली.
    विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार लोंढे म्हणाले,"ज्ञानाच्या शोधात राहणारा प्रत्येकजण हा खरा आजीवन विद्यार्थी असतो , शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते ".
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विश्वास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सदैव सजग, निस्वार्थी व सामाजिक भान असलेले पत्रकार बनण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक मर्डे यांनी केले. सूत्रसंचालन अंजली काकडे यांनी केले तर आभार सुभाष माने यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads