डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
जळगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना शैक्षणिक व सामाजिक बाबतीत मार्गदर्शन केले.या विशेष संवाद सत्रात जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कसे कार्यरत आहे, याचेही उदाहरणांसहित स्पष्टीकरण त्यांनी दिले.या कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश पाटील हेही उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता समाजात समतेचा संदेश पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. वसतीगृहातील विद्यार्थी हे भविष्यातील सक्षम नागरिक आहेत आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा