विविध मागण्यांसाठी जामनेर सकल जैन समाज आक्रमक तहसीलदारांना निवेदन सादर - दैनिक शिवस्वराज्य

विविध मागण्यांसाठी जामनेर सकल जैन समाज आक्रमक तहसीलदारांना निवेदन सादर

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जैन साधूंवर झालेले भ्याड हल्ले, विलेपार्ले नगरपालिकेकडून पाडण्यात आलेले जैन मंदिर ,संमेद शिखरजी, शत्रुंजय ,पालीताना, गिरनार, रानकपुर येथील जैन धार्मिक स्थळावर झालेले अतिक्रमण या वाढत्या घटनांमुळे जामनेर सकल जैन समाज आक्रमक झाला असून त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्याआहे. या घटनांचा निषेध करत संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल जैन समाजातर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले .
जामनेर सकल जैन समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जैन साधूंवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन व्हावे, विलेपार्ले नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जैन मंदिर तोड तोडल्याने त्या अधिकाऱ्यावर बरखास्त तिची कार्यवाही करावी. तोडलेल्या जैन मंदिराचे त्याच ठिकाणी भव्य पूर्ण निर्माण नगरपालिकेने करून घ्यावे पायी चालणाऱ्या साधू - साध्वी यांना संरक्षण दिले जावे.त्यांच्या यात्रा मार्गावर विश्राम स्थळ निर्माण करण्यात यावे तथा जैन तीर्थक्षेत्राचे पवित्रता राखण्यासाठी जैन तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात यावे जैन तीर्थक्षेत्र च्या आसपास यात्रे सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा विविध मागण्यांसाठी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी जैन श्री संघाचे संघपती ईश्वरलालजी कोठारी ,जैन श्री संघाचे सचिव साबद्राजी ,महामंत्री डॉक्टर कांतीलालजी जैन,अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे जामनेर शाखा अध्यक्ष सुमित मुनोत,संयुक्त मंत्री अर्पण लोढ़ा, कार्यकारिणी सदस्य हितेश चोपडा,श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र शहा, सुरेंद्र गुजराथी,हरिश शहा,तेरापंथी महासभा अध्यक्ष पवन सांखला,सचिव सुरेंद्र कुचेरीया, पार्श्वनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैतवाल, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, कार्याध्यक्ष विजय सैतवाल, सचिव राजेंद्र नारळे ,सहसचिव संजीव कुमार जैन ,संचालक राजेंद्र चतुर ,राजेंद्र खोबरे, रुपेश जैन ,सुदर्शन सैतवाल, दिनेश सैतवाल, मोहन जैन ,अजय जैन, जगन्नाथ सैतवाल ,महावीर जैन, अनिल सैतवाल, राजू दहीहंडी ,सुधाकर कस्तुरे, प्रशांत वायकोस, युवा अध्यक्ष निखिल जैन, भूषण सैतवाल, तेजस सूर्यवंशी ,महिला अध्यक्ष सौ.राजुल कस्तुरे , सौ. सुनीता विजय सैतवाल, सौ अंजली कस्तुरे ,सौ. संगीता कस्तुरे, सौ. रूपाली सूर्यवंशी, सौ. मोहिनी चतुर आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads