जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध; उद्या २५ एप्रिल रोजी 'जामनेर बंद'चे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध; उद्या २५ एप्रिल रोजी 'जामनेर बंद'चे आवाहन


जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ जामनेर तालुक्यातील सर्व हिंदू समाजाने येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी 'जामनेर बंद' करण्याचे आवाहन केले आहे.

या हल्ल्यात निष्पाप हिंदू पर्यटकांचा बळी गेला असून, त्यांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही कृत्ये अत्यंत निंदनीय आहेत. या पार्श्वभूमीवर जामनेरमधील हिंदू समाजाकडून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिक चौकात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी व संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, हा बंद शांततेत पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली...
सर्व हिंदू समाज, जामनेर तालुका





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads