तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गौरव - दैनिक शिवस्वराज्य

तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गौरव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव : महसूल विभागाच्या कामकाजात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जामनेर तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जामनेर येथे आलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या प्रसंगी, अडकलेल्या मजुरांना बचाव पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यासाठी त्यांचे प्रशासनिक कौशल्य आणि तत्परता विशेषतः वाखाणण्याजोगी ठरली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांच्या हस्ते श्री. आगळे यांना गौरविण्यात आले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे महसूल विभागाची प्रतिष्ठा उंचावली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads