पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध म्हणून जामनेर आज बंद; हिंदू समाजाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या अमानुष आणि भीषण दहशतवादी हल्ल्याचा संताप जनमानसात उफाळून आला असून, आज २५ एप्रिल रोजी जामनेर शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. जामनेर तालुक्यातील सर्व हिंदू समाजाच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी, संघटनांनी आणि तरुणवर्गाने भरघोस प्रतिसाद दिला.
सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठा, दुकाने, व्यवहार पूर्णतः ठप्प असून, रस्त्यांवर शांतता पसरली आहे. बंदला कुठलाही बळजबरीचा स्वरूप न देता नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला आहे. बंद दरम्यान कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.
सकाळी ११ वाजता नगरपालिक चौकात भव्य श्रद्धांजली व निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. देशभक्तीपर घोषणा, “दहशतवाद मुर्दाबाद” अशा गगनभेदी घोषणांनी चौक दुमदुमून गेला.
या वेळी अनेकांनी अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण करत हल्ल्यात बळी पडलेल्या हिंदू पर्यटकांसाठी दोन मिनिटं शांतता पाळली. उपस्थितांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत केंद्र शासनाने कठोर पावलं उचलण्याची मागणी केली.
हा बंद पूर्णतः शांततेत पार पडत असून, एकात्मतेचं प्रतीक ठरत आहे.
सर्व हिंदू समाज, जामनेर तालुका
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा