ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित,न्यू उर्दू प्राथमिक शाळेत इस्लामिक प्रश्न मंजूषा स्पर्धा उत्साहात संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित,न्यू उर्दू प्राथमिक शाळेत इस्लामिक प्रश्न मंजूषा स्पर्धा उत्साहात संपन्न...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरातील नामवंत शिक्षण संस्था *ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू उर्दू प्राथमिक शाळा, जामनेर येथे हज़रत मोहम्मद (स)(मोहम्मद पैग़म्बर) यांच्या जयंती निमित्त सिरतून्नबी या नावाने एक इस्लामिक प्रश्न मंजूषा (क्विज़ कॉम्पीटिशन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तब्बल 180 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवत संस्थेला नावलौकिक मिळवून दिला.
सध्या संपूर्ण जगात CBSE, इंग्लिश मिडीयम,या सारख्या शिक्षणाकडे पाल्यांचा दिवसागणिक कल वाढत चाललेला आहे. त्यात सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना महागडे शिक्षण घेणे अवाक्या बाहेरची बाब असल्याने असंख्य मुले ही चांगल्या शिक्षणा पासून वंचित राहतात.जामनेर तालुक्यात देखील CBSE पॅटर्न शिक्षण संस्थेचा बोलबाला पाहायला मिळत आहे.जामनेर शहरातील ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित,न्यू उर्दू प्राथमिक शाळा ही संस्था मात्र अपवाद ठरत आहे.मुस्लिम समाजातील असंख्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आणि त्यात शिक्षणाचा अभाव यामुळे या समाजातील मुले चांगल्या शिक्षणा पासून वंचित राहतात."आपण ही समाजाचे काही देणे लागतो" या उदात्त हेतूने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष~रहिम शेख व सचिव~ जाकिर शेख या दोघा भावांनी "जिकरा एज्युकेशन सोसायटी"या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अल्पावधित ही शिक्षण संस्था समाज बांधवांच्या पसंतीस उतरली आहे.या शाळेत प्रत्येक सण~उत्सव, महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी,26 जानेवारी,15 ऑगस्ट,या सारखे अनेक सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.अश्याच प्रकारे"ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित,न्यू उर्दू प्राथमिक शाळा, जामनेर येथे हज़रत मोहम्मद (स)(मोहम्मद पैग़म्बर) यांचे जयंती निमित्त सिरतून्नबी या नावाने एक इस्लामिक प्रश्नमंजूषा (क्विज़ कॉम्पीटिशन)स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तब्बल 180 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवत संस्थेला नावलौकिक मिळवून दिला.या प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यासाठी एक बक्षिस वितरण सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष~रहिम शेख व सचिव~ जाकिर शेख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads