महाराष्ट्र
अंत्रोळी येथील ग्रामदैवत स्वयंभू चहुमुखी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न ...
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापुर तालुक्यातील अंत्रोळी गावातील स्वयंभू चहुमुखी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.१२ एप्रिल रोजी पहाटे पासुनच हनुमानाच्या जन्मोत्सवाची कथेच्या कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुर्योदया वेळी हनुमान जन्मोत्सव करण्यात आला. जन्मकाळ होताच पुष्प वर्षाव करुन मिठाई प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यावेळी विधीवत श्री. हनुमानाच्या मुर्तीला अभिषेक करुन पुजन करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांंनी दर्शन घेतले. व दि.१३ एप्रिल रोजी स्वयंभू चहुमुखी हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर भारुडाचा कार्यक्रम करण्यात आला. मंदिरासमोर रांगोळी व पालखी मार्गावर फुलांचा साज करण्यात आला होता. हनुमान ची पालखी पुजारी यांच्या घरी जाऊन दिंडी व वारकऱ्यांच्या समवेत दहीहंडी हनुमान मंदिरासमोर आणून फोडण्यात आली. तसेच पुष्पवृष्टी ही करण्यात आली. ग्रामस्थांकडून नवसाचे नारळही फोडण्यात आले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
व १४ एप्रिल रोजी भव्य दिव्य जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा