खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक : डोहरी तांडा येथील इसमाचा जागीच मृत्यू - दैनिक शिवस्वराज्य

खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक : डोहरी तांडा येथील इसमाचा जागीच मृत्यू

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
खादगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत डोहरी तांडा येथील उदय हरि तवर (वय 47) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी (13 एप्रिल) रात्रीच्या सुमारास घडली.उदय तवर हे नेहमीप्रमाणे काम आटोपून जामनेरहून आपल्या गावी डोहरी तांडा येथे दुचाकीने परतत होते. सायंकाळी सुमारे सात वाजता जामनेर शहराच्या बाहेर, खादगाव रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर फेकले गेले व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. जामनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रताप मथुरे करीत आहेत.या दुर्घटनेमुळे डोहरी तांडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित वाहन व चालकाचा शोध घेण्याचे आवाहन नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे केले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads