महाराष्ट्र
अंत्रोळी येथे हनुमान जन्मोत्सव यात्रे निमित्व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे जय हनुमान जन्मोत्सव यात्रे निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ चे उद्घाटन संपन्न झाले.
या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक विनय आपटे याच्याकडून Rs. २१००१/- रुपये , द्वितीय पारितोषिक अनिल ढवळे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंत्रोळी याच्याकडून Rs. १५००१/- रूपये , तृतिय पारितोषिक संयोजन समिती याच्याकडून Rs. ५००१/- रुपये
व सर्व विजयी संघास गणपत कुंभार याच्याकडून ट्रॉफी देण्यात येणार आहे. इतर बक्षिसे क्रिकेटर क्लब व ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी कडुन देण्यात येणार आहेत. तरी पंचक्रोशीतील क्रिकेट संघानी या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला असुन आज दि १३ एप्रिल रोजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. वंसतराव आपटे, कै. नानासाहेब अंत्रोळीकर, कै. गिरीष ञंयत आपटे, कै.अजय अंत्रोळीकर, कै. अनिल कोळी यांच्या प्रतिमेचे पूजन संरपच व गावचे जेष्ठ नागरिक ब्रम्हदेव सलगरे व माजी उपसरपंच मजनोद्दीन पठाण, आनंदा कर्वे, बलभीम करपे,भाऊराया बेलदार, शहाजी भोसले, नेताजी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. व मैदानाचे पूजन जेष्ठ नागरिक ब्रम्हदेव सलगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेला आपटे दूध डेअरीचे संस्थापक विनय आपटे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या उद्घाटना प्रसंगी अंत्रोळी व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी मोठया संख्येत उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सयोजन रामचंद्र कोळी, गजिनाथ शेजाळ, गणपत कुंभार, भाऊराया बेलदार, इन्नूस शेख, रमेजराज शेख, आदम शेख, ब्रम्हदेव सलगरे, राजकुमार बसनाळे,रोहन गावडे, विकी कांबळे, शाहीर दाजी कांबळे , दादु शेख, अरबाज शेख यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा