जामनेरात शिवसेनेच्या शिंदे गटाला नवी ऊर्जा; विशाल लामखेडे, कैलास माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात शिवसेनेच्या शिंदे गटाला नवी ऊर्जा; विशाल लामखेडे, कैलास माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर, दि. 29 मे 2025 (सोमवार) – जामनेर तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटासाठी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ठाकरे गटातील माजी युवक तालुका अध्यक्ष विशाल लामखेडे आणि माजी उपशहरप्रमुख कैलास माळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश मुंबईत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे विशेष नेतृत्व लाभले. पक्षप्रवेशानंतर विशाल लामखेडे यांनी जाहीरपणे सांगितले की, “जामनेर तालुक्यात शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी आम्ही भरून काढणार असून, पक्षाला नव्या जोमाने उभे करू.”लामखेडे पुढे म्हणाले की, लवकरच त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाणार असून, तालुक्यात शिवसेनेचे संघटन बळकट करण्यासाठी कार्य सुरू केले जाईल. या प्रवेशामुळे जामनेर तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला नवे बळ व नवा उत्साह प्राप्त झाला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads