ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवस 'बॅगलेस डे' उत्साहात साजरा... - दैनिक शिवस्वराज्य

ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवस 'बॅगलेस डे' उत्साहात साजरा...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE Pattern), जामनेर येथे दिनांक 28 व 29 एप्रिल रोजी ‘बॅगलेस डे’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या जोखडातून बाहेर काढत आनंददायी आणि अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या हेतूने या गतीविधीचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम उपस्थित होत्या. या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेत मनसोक्त आनंद लुटला. सुरुवातीला शांतता आणि एकाग्रतेसाठी श्लोक पठण, संगीत आणि योगा सत्र घेतले गेले.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फायरलेस (बिना अग्नीचे) पाककृती तयार केल्या. चित्रकला व रंगभरण, नृत्य सादरीकरण, कला व शिल्पगतीविधी तसेच खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

या बॅगलेस उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले. अनुभवाधिष्ठित शिक्षणातून त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन मिळाले असून, विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षण हा आनंदाचा भाग कसा असू शकतो हे प्रत्यक्ष अनुभवले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads