गौरवाचा क्षण.. योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची झळाळती कामगिरी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या सुपुत्री डॉ. शरयू जितेंद्र विसपुते यांनी २री आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये झळाळते यश संपादन करत संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. नवी दिल्ली येथे २७-२८ एप्रिल रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी सिनियर गटात सुवर्णपदक पटकावले.
ही उज्वल कामगिरी एम. जे. कॉलेज, जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलाच्या योग केंद्रात सातत्यपूर्ण साधनेतून साकारली असून त्या प्रा. पंकज खासबागे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करतात.
जळगावच्या आत्मविश्वास आणि साधनेच्या शिस्तीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या योगकौशल्याची छाप पाडणाऱ्या डॉ. शरयू यांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
शिवस्वराज्य न्यूजतर्फे डॉ. शरयू यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा