जामनेर तहसील कार्यालयात १०० दिवस कार्यक्रमांतर्गत आधुनिक अभ्यागत कक्ष, आवक-जावक कक्ष, योजनादूत कक्ष व QR कोड वाचनालयाचे उद्घाटन मा. साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तहसील कार्यालयात १०० दिवस कार्यक्रमांतर्गत आधुनिक अभ्यागत कक्ष, आवक-जावक कक्ष, योजनादूत कक्ष व QR कोड वाचनालयाचे उद्घाटन मा. साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत जामनेर तहसील कार्यालयात अद्ययावत अभ्यागत कक्ष, आवक-जावक कक्ष, योजनादूत कक्ष आणि QR कोड वाचनालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष मा. साधनाताई गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमात विशेषतः ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी सुसज्ज अभ्यागत कक्षात बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये QR कोड वाचनालयाची सुविधादेखील देण्यात आली असून, नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मिळणार आहे. याशिवाय, कार्यालयाच्या परिसरातील भिंतींवर जमीन व्यवहारासंबंधी महत्त्वाचे कायदे व नियम गोष्टीरूप माहितीच्या फ्रेम स्वरूपात लावण्यात आले आहेत. गावनिहाय तलाठी भेटीचे वेळापत्रकही QR कोडद्वारे सहज पाहता येईल अशी सुविधा पुरवण्यात आली आहे.

या आधुनिक आणि नागरिकाभिमुख संकल्पनेमुळे तहसील कार्यालयातील शासकीय सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार आहेत. सदर उपक्रमाची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, मा. अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि मा. उपविभागीय अधिकारी (जळगाव भाग) श्री. विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे जामनेर तहसील कार्यालय हे एक ‘डिजिटल सक्षम’ व नागरिक-केंद्रित कार्यालय म्हणून उभे राहत आहे.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads