जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत. जामनेर बस आगाराला महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद व जल्लोष कर्मचाऱ्यांनी मोठा उत्साहात साजरा केला यावेळी नवीन मिळालेल्या बसेसचे लोकार्पण व पूजन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झाल्टे जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक बस आगार चे अधिकारी गोविंद पवार अमोल सुरवळकर गोपाल वाघ सुनील पाटील ग्रुपसिंग महाजन मोहन जैन जीएम करवंदे अनिल वंजारी गणेश पाटील वैभव पाटील अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन लाल परी बसेस जामनेर व सागराला मिळाले असून याचा जल्लोष व स्वागत डीजेच्या तालावर नाचत करण्यात आला या नवीन बसेसमुळे जामनेर व सागरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads