मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणी
जि. प. शाळा नवीदाभाडी येथील विद्यार्थी व पालकांनी ना. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याकडे शाळेतील बदलीपात्र शिक्षकांची बदली न होण्यासाठी साकडे घातले. जि. प. शाळा नवीदाभाडी येथे तीन शिक्षक कार्यरत असून त्यामधील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षकांच्या बदली होऊ नये यासाठी आज गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवीदाभाडी या गावातून अनेक पालक, महिला आणि शाळेतील मुले गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी आले होते. विद्यार्थी म्हणाले,आमच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही.आम्हाला तेच शिक्षक द्या आमचे शिक्षक आम्हाला छान शिकवतात,असे कथन ना.मा. गिरीश महाजन यांना सांगत होते. सदर प्रकरणाची पालकांकडून माहिती घेतली असता सदर शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून ८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला यावर्षी '"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. या शाळेतील विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिप मध्ये सहा ते सात विद्यार्थी पात्रता धारक असतात. सदर शाळेत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एम .टी .एस परीक्षाचे अभ्यास वर्ग घेतले जातात आणि विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत झळकतात. आता झालेल्या जामनेर टॅलेंट सर्च ( जे. टी. एस.) परीक्षेत जामनेर तालुक्यातून इयत्ता चौथीतील विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये तीन विद्यार्थी नवीदाभाडी शाळेचे आहे. अशा प्रकारची शाळेची यशोगाथा या शिक्षकांनी निर्माण केलेली आहे असे गावकऱ्यांनी सांगितले.
म्हणून गजानन मंडवे व ऋषिकेत शिंदे या शिक्षकांची बदली थांबवावी अशी पालकांची शाळेतील मुलांची व महिलांची मागणी होती.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा