जामनेर बाजारपेठेत अनोळखी इसम नग्नावस्थेत आढळला मंत्री गिरीष महाजन यांचे आरोग्यदूत जालमभाऊ राजपूत यांनी दाखल केले उपजिल्हा रुग्णालयात - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर बाजारपेठेत अनोळखी इसम नग्नावस्थेत आढळला मंत्री गिरीष महाजन यांचे आरोग्यदूत जालमभाऊ राजपूत यांनी दाखल केले उपजिल्हा रुग्णालयात

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर  शहरातील बाजारपेठ परिसरात आज (दि. २५ एप्रिल) एक अनोळखी इसम नग्नावस्थेत व आजारी अवस्थेत आढळून आला. नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच तत्काळ जलसंपदा मंत्री तथा स्थानिक आमदार श्री. गिरीषभाऊ महाजन यांचे आरोग्यदूत जालमभाऊ राजपूत यांनी संवेदनशीलता दाखवत सदर इसमाला तत्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सदर इसम मानसिकरित्या अस्वस्थ व अत्यंत दुर्बल अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. इसम कोणत्या भागातील आहे, त्याचे नाव व ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
यासंदर्भात प्रशासन व पोलीस यंत्रणेद्वारे माहिती घेतली जात असून, कोणी या इसमास ओळखत असेल किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयाशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जालमभाऊ राजपूत यांच्या या तत्परतेमुळे एका जीवाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असून नागरिकांनी त्यांच्या या सामाजिक भानाबद्दल कौतुक व्यक्त केले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads