महाराष्ट्र
हनुमान जन्मोत्सवानिमित्त अंत्रोळी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन ; या रक्तदान शिबिरास युवकांचा चांगला प्रतिसाद..
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त जय हनुमान उत्सव मंडळ अंत्रोळी व ग्रामपंचायत अंत्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरास आपटे दूध डेअरी संस्थापक विनय आपटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन जेष्ठ नागरिक ब्रम्हदेव सलगरे, आनंदा कर्वे, मजनोद्दीन पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे आयोजन जय हनुमान उत्सव मंडळ अंत्रोळी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व समस्त अंत्रोळी ग्रामस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरास अंत्रोळी व पंचक्रोशीतील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे , जेष्ठ नागरिक ब्रम्हदेव सलगरे, मजनोद्दीन पठाण, आनंदा कर्वे,नागनाथ कोळी, प्रकाश कोकरे, ग्रामपंचायत सदस्य इन्नुस खाजाभाई शेख , बाबासाहेब बंडगर,नेताजी थोरात, गणेश कुंभार, नागनाथ कोळी, गजीनाथ शेजाळ, अप्पासाहेब शेजाळ, बलभीम करपे,भाऊराव बेलदार, अविनाश कर्वे, सैफन शेख, ग्रामपंचायत शिपाई नाथाजी केंगार व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.
हि शिबीर अंत्रोळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवशंभु ब्लड बँकेचे श्रीनिवास बंदगी शंकर बटगिरी व सर्व कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा