जामनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळवाटप
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर | 14 एप्रिल 2025 रोजी
महान समाजसुधारक, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजकुमार सपकाळे यांच्या वतीने ग्रामीण उप रुग्णालय, जामनेर येथे रुग्णांना फळवाटप करून त्यांना आधार देण्याचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी भगवान भाऊ सोनवणे (RPI जिल्हाध्यक्ष), संदीप सुरवाडे, बुद्धभूषण सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ व मित्र परिवार उपस्थित होता.
या उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सेवाभावी वृत्तीने रुग्णांना दिलेल्या या सहकार्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा