फालतू बडबड थांबवा! पुरावा दाखवा नाहीतर गप्प बसा; मी उघड केलं तर खडसे फिरूही शकणार नाहीत – गिरीश महाजन यांचा इशारा
लोकांच्या मध्ये बसून बिनबुडाचे आरोप करत खडसे बडबड करतायत. पण मी आज जाहीर आव्हान देतो – जर माझ्यावरचे आरोप खरे असतील, तर एक पुरावा दाखवा, मी राजकारण सोडून टाकीन. पण मी जर एक गोष्ट बाहेर काढली, तर खडसे यांनी घरातून बाहेर पडायचं नाही असे सणसणीत आणि थेट शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना उत्तर दिलं आहे.
सध्या व्हायरल झालेल्या एका पत्रकाराच्या क्लिपचा आधार घेत खडसे यांनी दावा केला की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. इतकंच नाही तर त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याचे कॉल रेकॉर्ड्स असल्याचंही सांगितलं. रात्री उशिरा सतत होणारे कॉल्स ही त्याची साक्ष असल्याचं खडसे म्हणाले.या आरोपांमुळे चिडलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी आज थेट खडसेंना जाहीर आव्हान दिलं. "मी गेली अनेक वर्षे जनतेची सेवा केली आहे. खडसे सतत माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत. पण पुरावा काहीच नाही. पुरावा असेल, तर मी आजच राजकारणातून निवृत्त होतो. पण मी जर काही गोष्टी बाहेर काढल्या, तर खडसे यांना तोंड दाखवता येणार नाही.महाजन आणि खडसे यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील राजकारणात महत्वाचे चेहरे असून, त्यांच्यातील सध्याचा वाद अधिकच गडद होताना दिसतो आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा