जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान
जामनेर, दि. ६ एप्रिल – ग्रामीण भागातील विकासाच्या वाटचालीत झपाट्याने प्रगती करत टाकली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह यांच्या वतीने त्यांना 'राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातील S4G हॉटेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिनेअभिनेता महेशदादा देवकाते पाटील, सिनेअभिनेत्री निलोफर पठाण, प्राची पालवे आणि प्रांजली पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गावात स्वच्छता, पाणी योजना, हरित ग्राम संकल्पना, ग्रामसडक योजना, महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकास आदी क्षेत्रात त्यांनी घेतलेले पुढाकार हे या सन्मानामागचे मोलाचे कारण ठरले.या गौरवाने टाकली खुर्द गावात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, तसेच जामनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सरपंच जितेंद्र माळी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल बोलताना सरपंच माळी म्हणाले, हा सन्मान संपूर्ण टाकली खुर्द गावासाठी आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. भविष्यातही विकासकामे अधिक जोमाने राबवणार आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा