श्रीलिला हाॅस्पिटल आयोजित महारक्त दान शिबिरात १६१ रक्त पिशव्याचे संकलन ..रक्तदात्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद
दि. ६ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात १६१ रक्त पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात रक्तादात्त्यांचा उदंड प्रतिसाद दिसून आला. रक्तदान शिबिराची सुरुवात बहुजनांच्या उद्धारासाठी अविरत झटणार्या महापुरुषांच्या प्रतिमा पुजन करुन झाली
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जामनेर पोलिस स्टेशनचे पि.आय. मा श्री. कासार साहेब भाग्योदय कलेक्शन चे संस्थापक मा.श्री. प्रकाश पाटील डाॅ. दिपक ठाकुर डाॅ नरेश पाटिल डाॅ. आर झेड ललवाणी. डाॅ. सचिन बसेर शिक्षक परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष मा.श्री. सलीम शेख सर डि.सी.पी.एस. संघटनेचे कार्याध्यक्ष मा.श्री. संदिप पाटील सर मा.श्री. प्रदिप सोनवणे सर(तालुकाध्यक्ष शिक्षण परिषद जामनेर ) हे उपस्थित होते मा.श्री. कासार साहेब ( पी.आय. जामनेर)यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे.युवकांनी रक्तदानाच्या चळवळीत सहभागी होऊन रक्तदान करावे असे अवाहन केले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा.श्री. दिपक ढोणी पाटील यांनी प्रास्ताविकातुन श्रीलिला हाॅस्पिटल आयोजित रक्तदान शिबिराची रुपरेषा स्पष्ट करीत . मागिल पाच वर्षातील रक्तदान शिबिराचा लेखाजोखा मांडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.श्री. प्रल्हाद सोनवणे मा.श्री. प्रल्हाद बोरसे मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष श्री. योगेश पाटील सेवा संघ संघटक श्री. दशरथ पाटील. सेवा संघ सचिव श्री. किशोर पाटील. सेवा संघाचे सर्व पदाधिकारी गोपाळ समाज महासंघाचे राज्यप्रतिनिधी श्री. ग्यानदेव भोर स. श्री. गोकुळ महाजन सर . तसेच श्रीलिला हाॅस्पिटलचा सर्व स्टाप यांनी खुप मेहनत घेतली रक्तदान शिबिराच्या दरम्यान मा. श्री दिलीप श्रीपत पाटील... माजी सभापती कृ. ऊ. बाजार समिती जामनेर यांनी ही सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले.. जामनेर शहर असोसिएशनचे सर्व सदस्य पदाधिकारी ग.स.सोसा. संचालक मा.श्री. अनिल गायकवाड सर. वार्ताहार संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी रक्तदान शिबिरास सहकार्य करणारे बहुजन परिवर्तनवादी संघटनाचे पदाधिकारी तसेच. मा.श्री. स्नेहदिप गरुड मा.श्री. विश्वजित पाटील. जामनेर एज्यकेशन सोसा. सचिव मा.श्री. जितेंद्र पाटील. मा.श्री. दिलिप खोडपे सर मा.श्री. डाॅ. प्रशांत पाटील. मा.श्री. डाॅ.प्रशांत भोंडे ( माजी गटनेते नगरपरिषद जामनेर)यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांना प्रोत्साहन देत शिबिरास शुभेच्छा दिल्या मा.श्री. दिलिप श्रीपत पाटील व श्रीलिला हाॅस्पिटलचे संचालक मा.श्री.डाॅ. उमाकांत पाटील व मा.श्री. डाॅ. प्रशांत पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा