जळगावात जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडलेशिरसोली गाव परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, ३९ रुग्णांची तपासणी
जळगाव, जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सोमवारी शिरसोली (बुद्धविहार, जळके रोड) येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत अखिल भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये डॉ. सचिन नरवाडे, डॉ. माधुरी नेहते, डॉ. पुष्कर महाजन आणि डॉ. मनोज विसपुते या तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून महिलांना, पुरुषांना व बालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण ३९ रुग्णांची तपासणी व १९ जणांची रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तसेच, रुग्णांना मोफत औषधांचे वाटप देखील करण्यात आले.या उपक्रमासाठी आयुष संचालक व अधिष्ठाता डॉ. रमण घुंगराळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे व डॉ. राहुल चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विशाल गुंड (अधिपरीचारक), श्री. मिथुन बारेला (प्रयोगशाळा सहाय्यक), श्री. सागर जाधव (रुग्णवाहिका चालक), श्री. चेतन तांबोळी (औषध वितरण सहाय्यक), आणि श्री. दीपक घ्यार (शिबिर समन्वयक सहाय्यक) यांचे मोलाचे योगदान लाभले.
शिबिराच्या माध्यमातून शिरसोली परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा