राज्यस्तरीय सन्मान – जळगाव पोलीस विभागास १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत गौरव
मुंबई | ७ मे २०२५ – जळगाव पोलीस विभागाने आपल्या कार्यक्षमतेचा आणि नवोन्मेषाचा ठसा उमठवत राज्यस्तरावर मानाचा तिसरा क्रमांक पटकावला आहे. मंत्रिमंडळ सभागृह, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या गौरवप्राप्त क्षणी, मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यालयीन सुधारणा आणि व्यवस्थापन क्षेत्रात जळगाव पोलिसांनी दाखवलेली कार्यकुशलता आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन यामुळे हा सन्मान प्राप्त झाला.
उपस्थित मान्यवरांमध्ये उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीगण, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव आणि महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री. राजेशकुमार यांचा समावेश होता. विविध विभागांचे वरिष्ठ सचिव, प्रधान सचिव यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
जळगाव पोलीस दलाचे मन:पूर्वक अभिनंदन
हा सन्मान हे फक्त यशाचे द्योतक नसून, जनतेच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिस दलाच्या समर्पणाची पावती आहे. भविष्यातही अशीच कार्यप्रदर्शनाची परंपरा टिकवून ठेवावी, हीच अपेक्षा
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा