जामनेर तालुक्यात खरीप 2025 हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यात खरीप 2025 हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर खरीप हंगाम 2025 ची पूर्वतयारी करण्यासाठी जामनेर तालुक्यात आढावा बैठक पार पडली. ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री. अशोक भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पाल येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. महेश महाजन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीस तहसीलदार नानासाहेब आगळे, गट विकास अधिकारी श्री कृष्ण इंगळे , तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत तालुका कृषी अधिकारी यांनी खरीप हंगाम 2025 साठी आवश्यक असलेल्या तयारीचे सादरीकरण केले. शेतकऱ्यांसाठी बी-बियाण्यांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा, जलसंधारण व सिंचनासाठी उपाययोजना, पिकांच्या संरक्षणासाठी खते व कीटकनाशकांची उपलब्धता, तसेच हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात आला.

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय शिफारशींनुसार पेरणी नियोजन, खत व्यवस्थापन, वाळूवार व उधाण पिकांची निवड, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर योग्य तोडगे सुचवले.

बैठकीत पुढील महत्वाचे ठराव एकमताने पारित करण्यात आले:

शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाण्यांचा पुरवठा व वितरण सुनिश्चित करणे.

कृषी विज्ञान केंद्राच्या शिफारसीनुसार पिक नियोजन करणे.

कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती यांच्यातील समन्वय वाढविणे.

शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांची अद्ययावत माहिती वेळोवेळी पोहोचवणे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक भोईटे यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर सहकार्याने काम करून खरीप हंगाम 2025 यशस्वी करण्याचे निर्देश दिले.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads