भाजप जिल्हाध्यक्षांची नवी नियुक्ती जाहीर : चंद्रकांत बाविस्कर, राधेश्याम चौधरी व दीपक सूर्यवंशी यांच्याकडे सूत्रे - दैनिक शिवस्वराज्य

भाजप जिल्हाध्यक्षांची नवी नियुक्ती जाहीर : चंद्रकांत बाविस्कर, राधेश्याम चौधरी व दीपक सूर्यवंशी यांच्याकडे सूत्रे

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव :भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला असून पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदाच्या नव्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यात जामनेरचे निष्ठावान व अनुभवी कार्यकर्ते माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.तसेच, पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून राधेश्याम चौधरी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे, तर जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चंद्रकांत बाविस्कर यांनी तालुकाध्यक्षपदाच्या काळात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यक्षमतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांच्याकडे आता जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्याचप्रमाणे, दीपक सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात महानगरातील पक्षबांधणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या अनुभवानुसारच त्यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या नव्या निवडीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads