अकोले- मंद्रूप येथे नृसिंह जयंती निमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन..... शाहरुख खान व रोहन पवार यांच्यातील ७५ हजाराची अंतिम कुस्ती बरोबरीत.. - दैनिक शिवस्वराज्य

अकोले- मंद्रूप येथे नृसिंह जयंती निमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन..... शाहरुख खान व रोहन पवार यांच्यातील ७५ हजाराची अंतिम कुस्ती बरोबरीत..




समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : द. सोलापूर तालुक्यातील अकोले- मंद्रूप येथे नृसिंह जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहातंर्गत कुस्ती स्पर्धेत झालेल्या कुस्ती फडातील ७५ हजाराची अंतिम कुस्ती पुण्याच्या हनुमान आखाड्याचा पैलवान शाहरुख खान व कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा पैलवान रोहन पवार यांच्यामध्ये झाली. पाऊण तासाच्या झटापटीनंतर दोन्ही तुल्यबळ पैलवानांची दमछाक झाली. यामुळे अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाने ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली व निमगावचा दत्ता बोडरे व पंढरपूरचा गणेश चव्हाण यांच्या दुसऱ्या क्रमांकाची ५१ हजाराची कुस्ती झाली. तर सोलापूरचा पहिलवान रामा शेळके व करमाळ्याच्या कंदरचा अमित जगदाळे यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजाराची कुस्ती झाली. व तसेच या फडामध्ये लहान मोठ्या अशा तीन ते चार लाख रुपयांच्या कुस्त्या झाल्या.
    अकोले (मंद्रुप) येथे गावचे उद्योगपती रमेश आसबे यांनी सोमवारी हा कुस्ती फड भरवला होता. याचे उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, नामदेव आसबे व इतरांच्या हस्ते करण्यात आले. 
   यावेळी या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक मनीष देशमुख ,कुस्ती स्पर्धेचे आयोजक रमेश आण्णा आसबे, बाळु मामा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम बापु पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष समाधान आसबे,माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे ,भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष मळसिध्द मुगळे, महाराष्ट्र उप केसरी पैलवान भरत मेकाले ,सुनील नांगरे सावकार, पैलवान बाळासाहेब माने, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत कडते ,विंचूर सरपंच सुभाष पाटील ,विंचूर चे उपसरपंच भीमाशंकर फुलारी, मंद्रूप चे माजी उपसरपंच रमेश आण्णा नवले, मनगोळी गावचे सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड,नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, माजी उपसरपंच सतीश क्षीरसागर ,गावचे पोलीस पाटील हणुमंत पवार,विठ्ठल घंटे, अंत्रोळीचे ब्रम्हदेव सलगरे , आनंदा कर्वे, अंजय कर्वे, गणपत कुंभार, अंत्रोळीचे ग्रा.सदस्य इन्नुस शेख, अकोले मंद्रूप चे माजी सरपंच बाळासाहेब माने दादा जाधव मिलन माने,मुकिंद माने, अशोक माने परमेश्वर सुरवसे अमर साळुंखे तुळशीराम पवार ग्रामपंचायत शिपाई परशुराम कोळी सतीश पवार तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकार वर्ग सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी त्याचबरोबर अकोले मंद्रूप येथील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते
        या फडाचे सूत्रसंचालन धनाजी मदने व अशोक धोत्रे यांनी केले. या फडामध्ये अनेक नामवंत मल्लांच्या रोमहर्षक कुस्त्या झाल्या. त्यात शाहरुख खान, रोहन पवार, दत्ता बोडरे, रामा शेळके व अमित जगदाळे यांच्या आक्रमक कुस्तीने डोळ्याचे पारणे फिटले.
    या फडात कुस्त्यांचे पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, बाळासाहेब माने, रमेश जाधव व इतरांनी काम पाहिले. या फडाचे खुमासदार शैलीत धनाजी मदने व अशोक धोत्रे यांनी सूत्रसंचालन केले
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads